जळगाव लाईव्ह न्युज | १२ मे २०२२ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात निर्देश सर्व मदरशांना देण्यात आले असून जारी केलेले निर्देश सर्व मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू असणार आहेत.
गेल्या महिनाभरापासून रमजाननिमित्त उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांना सुट्ट्या होत्या मात्र आता मदर्से पुन्हा सुरू झाले आहेत अशा वेळी मदरशांमधील शिक्षण देखील सुरू झाले आहे या पार्श्वभूमीवर मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री दानिश आजाद अंसारी यांनी याबाबत बोलताना सांगितले की आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. 14 मे पासून वार्षिक परीक्षा सुरू होणार असून नवीन सत्र सुरू होणार असल्यामुळे सर्व मदरशांमध्ये विद्यार्थ्यांचे येणे सुरू होणार आहे अशा वेळी आम्ही हा निर्णय घेतला आहे बोर्डाने सर्व जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देखील दिल्या आहेत.