⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

तरीही त्याच पंकजा मुंडेंवर अन्याय : खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । भारतीय जनता पक्ष वाढावा यासाठी मुंडे, महाजन, खडसेंनी भाजपला बहुजन समाजाचा चेहरा देण्याचे कार्य केले. एकेकाळी भाजपची ओळख ब्राम्हण, मारवाडी लोकांचा पक्ष अशी होती, ती बहुजन नेतृत्वाने खोडून काढला. अश्या मुंडे महाजनांवर भाजपने अन्याय केला आहे. पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांना उमेदवारी न देता भाजपने मुंडेंच्या घराण्याचार अन्याय केला आहे. अशी टीका एकनाथराव खडसे (EKNATH KHADSE) यांनी भाजपवर केली. (KHADSE COMMENT ON PANKAJA MUNDE)

याच बरोबर माझी संपूर्ण हयात भाजपच्या वाढीसाठी गेली. त्यासाठी मी अपार मेहनत घेतली मात्र भाजपने माझ्यावर अन्याय केला मला अडगळीत टाकले. आता शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहेत मला अडगळीतून बाहेर काढले आहे. माझ्या अडचणीच्या काळात मला साथ दिली आहे. त्याच्या विश्वासानुसार राष्ट्रवादी पक्ष विस्तारासाठी काम करणार अशी ग्वाही एकनाथराव खडसे (EKNATH KHADSE) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील वाचा : भाजपने मला अडगळीत टाकले आणि पवारांनी मला बाहेर काढले : खडसे

पुढे ते म्हणाले कि, पंकजा मुंडेंना (PANKAJA MUNDE) उमेदवारी न देणं हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मात्र ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचे पक्षात काहीच योगदान नाही ते अचानक येतात आणि पदावर बसतात. गोपीनाथ मुंडे पक्षासाठी शहीद झाले. मात्र त्यांच्या मुलीची म्हणजेच पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांना उमेदवारी नाकारून पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. असे खडसे म्हणाले.

विधान परिषदेची निवडणूक २० जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने त्यांचे उमेदवार बुधवारी जाहीर केले आहेत. तर आज सकाळी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (EKNATH KHADSE) यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली. गेली चाळीस वर्षे मी निष्ठेने काम करीत होतो. अनेक वेळा माझ्यावर अन्याय होत होता. अनेक प्रसंग असे होते कि भाजपने मला वारंवार गाजर दाखविले म्हणून मला राष्ट्रवादीत यावे लागले. मी अख्खे आयुष्य भाजप उभी करण्यात घालविले. शरद पवार यांनी विश्वास दाखवून मला संधी दिली. अडचणीच्या वेळातच साथ देणे, हात देणे आवश्यक असते.यामुळे पवारांचे आणि राष्ट्रवादीचे रुण मी कधीच विसरणार नाही. असे यावेळी खडसे (EKNATH KHADSE) म्हणाले.