---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

IMD कडून जळगाव जिल्ह्याला २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट ; उकाड्यापासून मिळणार दिलासा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२४ । उत्तर बंगालचा उपसागर आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आगामी तीन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला.

Rain 1 1 jpg webp

यंदा राज्यातील जवळपास सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्या असून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात सर्वत्र उन आणि उकाड्याने लोक हैरान झाले होते. आता पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना १८ ते २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

---Advertisement---

दरम्यान, गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुले जळगावकर उन आणि उकाडा आशा दोन्ही समस्यांशी झुंजत होते. मात्र, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला २१ ऑगस्ट पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बसरल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---