जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकीय ज्वारी खरेदीस सुरुवात झाली असून ज्वारीला प्रति क्विंटल ३ हजार ३७१ रुपये भाव देण्यात आला आहे. उशीरा ज्वारी खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, दरम्यान नोंदणीही करण्यात आली आहे.

ज्वारी खरेदीचा शुभारंभ आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हस्ते काटा पूजन झाले. सांगवी येथील शेतकरी दिवाकर वासुदेव कोळंबे यांची ज्वारी या ठिकाणी मोजण्यात आली. या केंद्रावर ज्वारीचा दर प्रति क्विंटल ३ हजार ३७१ रुपये आहे.
स्वच्छ ज्वारी आणण्याचे केंद्रामार्फत आवाहन
केवळ ज्वारी स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता केंद्रावर जावे लागणार नाही, त्यायाच्साा अतिरिक्त भुर्दंड टाळता यावा यासाठी शेतकऱ्यांनी स्वच्छ ज्वारीच शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर आणावी असे आवाहन केले.
८ हजार ७०० क्विंटल खरेदीचे आहे उद्दिष्ट
यावल शासकीय ज्वारी खरेदी केंद्रासाठी कोरपावली विकास सोसायटीकडे १० हजार क्विंटल खरेदीसाठी बाबतीत नोंदणी करण्यात आली असून शासनाने केवळ ८ हजार ७०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र शासनाने उशिरा केंद्र चालू केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार ज्वारी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री केली त्यामुळे शासनाविषयी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे