जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी, दक्षिण तीरावर श्रीक्षेत्र पाडळसरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत, पुरातन जागृत देवस्थान /”नाटेश्वर’ महादेवाचा यात्रोत्सव, माघ कृष्ण दशमी म्हणजेच शनिवारी (दि.२६) साजरा होणार आहे. या ठिकाणी पुर्वीपासून महादेवाला दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य गावातील घराघरातून अर्पण केला जातो.
यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाडळसरे ग्रामपंचायतीकडून लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रतीनाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर विलोभनीय असून काळ्या दगडांनी हेमांडपंथी बांधकाम आहे.
कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार उपदिशांना वाघाच्या मूर्ती व त्यावर कळस आणि भागवत धर्माची पताका आहे. मंदिरात पाषाण शिळा त्यात लिंग हे संगमरवरी आहे. धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर चोपडा, शिरपूर व अमळनेर या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
- विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या वधूला अटक; सात दिवसाची पोलिस कोठडी
- Gold Silver Rate : सोन-चांदी पुन्हा महागली, आजचे ताजे दर जाणून घ्या
- दुचाकी अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू
- तळेगावात सर्पदंशाने ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज