जळगाव जिल्हाजळगाव शहर

संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त चर्मकार संस्थेतर्फे माल्यार्पण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । जगतगुरु संत रोहीदास महाराज यांच्या जयंती निमित्त चर्मकार बहुद्देशीय संस्थातर्फे त्यांच्या प्रतिमेला पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

दरवर्षी मिरवणूक काढून संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी होते. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे अत्यंत सध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. घरगुती वातावरणात केवळ प्रतिमा पूजन करून संत रोहिदास महाराज यांच्या कार्याला स्मरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी प्रतिमा पूजन करीत माल्यार्पण केले. यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमांना पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करीत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी अध्यक्ष किशोर धोरे म्हणाले की, संत रोहिदास महाराज परिश्रम घेऊन अत्यंत समर्पितपणे आपले कार्य करीत असत. ज्या कोणालाही मदतीची गरज भासली, तेव्हा संत रोहिदास त्यांच्या मदतीला धावत. जर आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंत: करणात वास करतो, असे ते सांगायचे, असे सांगत किशोर धोरे यांनी जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.

यावेळी उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे, महिला सदस्य लताबाई धोरे, नीलिमा धोरे, रेखाबाई अहिरे, सदस्य रविंद्र धोरे, महेंद्र मेथे, लखन झिरे, साहेबराव खजुरे, कैलास मेथे, छोटू धोरे, किशोर हिरे, भाईदास कासवे, राजू धोरे, विक्रम हिरे, भरत बेरभैय्या, सागर बेहेरे, दिलीप जिरे, पंडित धोरे, संतोष धोरे, सुनील वाघ, अनिल चंद्रे, अशोक बेरभैया, परमेश्वर अहिरे आदी उपस्थित होते. प्रेमराज शिंपी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button