जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात हरतालिकेची पूजा करण्यात आले. यावेळी कुमारीका व महिला यांनी व्रत करत हरतालिकेचे पूजन केले. हरतालिकेच्या व्रतामध्ये उमा – महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक या भागात राहणाऱ्या कुटुंबात गणपतीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हे व्रत केले जाते. मात्र यंदा हे व्रत अधिक उत्साहात करण्यात आले. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात महिलांनी व्रत केले.

चातुर्मासातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात, ते गणपतीचे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते. मात्र, त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते.








