⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | आरोग्य | चिंताजनक : जगातील ‘इतके’ धूम्रपान करणारे नागरिक भारतात राहतात

चिंताजनक : जगातील ‘इतके’ धूम्रपान करणारे नागरिक भारतात राहतात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ देशासह संपूर्ण जागात धूम्रपान करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल 12 टक्के लोकं भारतात राहतात.यामुळे भारत सरकार या कडे गम्बीर्याने पहात असून याबाबद नवीन कायदा करणार आहे. यासाठी केंद्र शासन कॅनडा पॅटर्न राबवणार आहे.

धूम्रपानामुळे अतिशय गंभीर प्रकारचे आजार होतात. धूम्रपानामुळे पुरुषांचं आयुष्य तब्बल 12 वर्षे आणि महिलांचं आयुष्य तब्बल 11 वर्षांनी कमी होतं. धूम्रपान करणं आरोग्यासाठी घातक असूनही लोकं धूम्रपान करणं सोडत नाही. प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा लिहिला जाणार आहे. असं करणारा कॅनडा हा जगातील पहिला देश असणार आहे. दोन दशकांपूर्वी कॅनडाने तंबाखू उत्पादनांच्या पॅकेजिंगवर ग्राफिक फोटो आणि चेतावणी संदेश लिहिण्यास सुरुवात केली होती. यानंतर जगातील अनेक देशांमध्ये केले गेले.

कॅनडाच्या मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती मंत्री, कॅरोलिन बेनेट म्हणाल्या की, “लोकं तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील इशाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. या संदेशाचा प्रभाव कमी झाला असून याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक तंबाखू उत्पादनांवर आरोग्यविषयक इशारा दिल्यास आवश्यक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर जे लोक पहिल्यांदा सिगारेट ओढत आहेत. त्यांनाही तंबाखूजन्य पदार्थांची तीव्रता कळेल.”

कॅनेडियन कॅन्सर सोसायटीचे वरिष्ठ धोरण विश्लेषक रॉब कनिंगहॅम म्हणाले की, “हे जगभर एक उदाहरण प्रस्थापित करणार आहे. ही एक चेतावणी असेल ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे प्रत्येक धूम्रपान करणाऱ्यापर्यंत पोहोचेल. ” धूम्रपानामुळे हृदयविकार, कर्करोग, त्वचेचे आजार होतात. त्याचबरोबर प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह