⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांनो काळजी घ्या! व्हायरल फिवर, गॅस्ट्रोची साथ पसरली! काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?

जळगावकरांनो काळजी घ्या! व्हायरल फिवर, गॅस्ट्रोची साथ पसरली! काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या पावसाळा सुरु असून यादरम्यान तब्बेतीची काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्याम, जळगावात व्हायरल फिवर, गॅस्ट्रो ,तापाची, साथ पसरली असून यामुळे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जीएमसी येथील ओपीडी ही 500 वरून 1100 पर्यंत पोहोचली आहे. या व्हायरल फिवरच्या रुग्णात वाढ होण्याचे कारण म्हणजे सध्या वातावरणातील होणारे बदल असल्याचे सांगितले जात आहे.

जीएमसीतील तीन महिने पुरवला जाणारा औषध साठा आता दोन महिन्यातच संपतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तज्ञ असलेला डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक सुविधेने रुग्णांचा विश्वास ओपीडीवर वाढला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्या जीएमसीत आठवड्याला सतराशे ते अठराशे सलाईन तसेच खोकल्याच्या बाटल्या रुग्णांना पुरवल्या जात आहेत. या व्हायरल फिवरच्या रुग्णात वाढ होण्याचे कारण म्हणजे सध्या वातावरणातील होणारे बदल असल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार तज्ञ असलेला डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक सुविधेने रुग्णांचा विश्वास ओपीडीवर वाढला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्या जीएमसीत आठवड्याला सतराशे ते अठराशे सलाईन तसेच खोकल्याच्या बाटल्या रुग्णांना पुरवल्या जात आहेत. या व्हायरल फिवरच्या रुग्णात वाढ होण्याचे कारण म्हणजे सध्या वातावरणातील होणारे बदल असल्याचे सांगितले जात आहे.

ही आहेत व्हायरलची लक्षणे :
घसा खवखवणे, अंगदुखी, ताप, सर्दी, थकल्यासारखं वाटणे ,डोळ्यात सतत पाणी येणे,सांधेदुखी, कणकण भासणे, डोकेदुखी जुलाब होणे, ही लक्षणे डॉक्टरांकडून सांगितले जातात.

या व्हायरल पासून बचावासाठी काय करायला हवे :
शक्यतो उकळून पाणी प्यावे, घरात किंवा घरात बाहेर पावसाचे पाणी साठवू नये याची काळजी घ्यावी.
गरम पाण्यात कापड भिजवून छाती आणि पाठ दिवसातून किमान एक ते दोन वेळा शेकून घ्यावे हात पाय स्वच्छ धुवावे.

या वायरल फिवर गॅस्ट्रोच्या साधे मध्ये लहान मुलांचा जास्त समावेश असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आठवड्याभरापेक्षा अधिक काळ बरं होण्यासाठी लागत असल्याने रुग्ण कंटाळले आहेत ,त्यात ताप खोकल्याची लक्षणे अधिक तीव्र असल्याने औषधांचे मागणी देखील वाढले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.