जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिवस साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । डॉ. उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रात्यक्षिकातून अन्न दिवसाचे महत्व विषद करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ एस एम पाटील, परिसर संचालक अध्यक्ष म्हणून शिक्षण व तंत्र संशोधन संचालक डॉ अशोक चौधरी, डॉ शैलेश तायडे, प्राचार्य, कृषि महाविद्यालय डॉ पी आर सपकाळे, प्राचार्य, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अतुल बोंडे, सहायक कुलसचिव यांची उपस्थिती होती. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रागी बिस्कीट, चॉकलेट क्रीम रोल, लादी पाव, ब्रेड, खारी, टोस्ट इ. बेकरी पदार्थ बनवून विक्री केले. डॉ एस एम पाटील यांनी जागतिक अन्न दिवसाचे महत्व सांगितले.

डॉ अशोक चौधरी यांनी जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना भुकेच्या समस्येबद्दल जागरूक करणे हा आहे. एकीकडे लोक उपाशी झोपतात, तर दुसरीकडे काही लोक अन्न वाया घालवतात. अन्नाची नासाडी होता कामा नये, हे लोकांना समजावण्याचा प्रयत्न जागतिक अन्न दिनाच्या माध्यमातून केला जातो. अन्न वाचवणे आणि ते लोकांमध्ये वाटणे खूप महत्वाचे आहे. जागतिक स्तरावर असा दिवस साजरा केल्याने लोकांमध्ये जागृती निर्माण होते. अंतिम वर्षाचे विद्यार्थी सगळे पदार्थ स्वतः तयार करायला शिकतात व स्वतःच त्याची विक्री करून कसे स्वतः उद्योग सुरू करू शकण्याची क्षमता निर्माण करतात याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन कार्तिक रावने तर प्रा. मोहित बनपूरकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सारिका पाटील, दीपक काशीकर, प्रशांत कोळी, सचिन पाटील या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button