जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२५ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्वाकांक्षी आणि उपयुक्त तसेच महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मनमाड ते जळगाव या रेल्वेच्या चौथ्या लाइनसाठी सावखेडा बुद्रुक परिसरात भूसंपादन प्रोसेस सुरु झाली असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सावखेडा परिसरात नागरिकांना नोटिसा देण्यात आला आहे.

सावखेडा बुद्रुक या परिसरात अचानक भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूसंपादनासाठी भूमिअभिलेख विभागाकडून कार्यवाही सुरू असून, संबंधित गट क्रमांकातील नागरिकांना अधिकृत नोटिसा देण्यात आल्या आहेत.

‘मल्ट्री ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्प योजनेंतर्गत १६० किलोमीटरच्या मनमाड-जळगावच्या चौथ्या लाइनला २ हजार ७७३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे शहर आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होईल.
याचसोबत जवाहरलाल नेहरु बंदर आणि वाढवण बंदर, मनमाड आणि नाशिकचीही कनेक्टिव्हिटी वाढणाप आहे. यामुळे कृषी आणि औद्योगिक वाहतूक सुलभ होणार आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासालाही पाठबळ मिळणार आहे. मनमाड, नाशिक आणि जळगावमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.








