---Advertisement---
गुन्हे

महिलेची पोत धूमस्टाईलने लांबवली, दूर जात चोरट्यांनी पुन्हा पोत महिलेला दाखवली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून धूमस्टाईल सोनसाखळी लंपास करणारे शहरातून गायब झाले होते परंतु शहरात पुन्हा चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. ईश्वर कॉलनीत महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

chain snatching jpg webp

ईश्वर कॉलनीत शीतल संजय रोकडे (वय-५२) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.  बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी वर्षा कॉलनीत त्या प्रमोद रोकडे यांच्या घरी गेल्या होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्या पुन्हा घराकडे येण्यासाठी पायी निघाल्या होत्या. ८.१५ वाजेच्या सुमारास रुचिका ब्युटी पार्लरजवळ समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोघांनी दुचाकी हळू करीत शीतल रोकडे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची मंगलपोत तोडून नेली.

---Advertisement---

काही कळण्याच्या आत दुचाकीस्वार दोघे भरधाव वेगाने निघून गेले. इतकंच नव्हे तर चोरट्यांनी थोडे अंतर लांब जात कोपऱ्यावर उभे राहून चोरलेली पोत पुन्हा महिलेला दाखवली आणि डायमंड हॉलच्या रस्त्याने पळ काढला. रोकडे यांनी याप्रकरणी कुटुंबाला माहिती देत एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---