नशिराबादला महिला करणार दुर्गादेवीची स्थापना
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । गेल्या सतरा वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या नशिराबाद गावातील अजिंक्य महिला दुर्गोत्सव मंडळातर्फे यंदाही दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दुर्गोत्सव दरम्यान दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यंदाचा दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष राजश्री नांदुरकर, उपाध्यक्ष जयश्री पाटील, खजिनदार दिपाली बाविस्कर व सचिव कामिनी शिवरामे यांची निवड करण्यात आली आहे.
दर सालाबाद प्रमाणेच या वर्षा सुध्दा अजिक्य महिला दुर्गोत्सव मंडळा तर्फे उत्सव हा दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. अजिंक्य महिला मंडळाचे विशेष महत्त्व असे आहे की नशिराबाद गावात एकमेव गावाच्या मानाची देवी म्हणून प्रसिद्ध आहेत. याच्या विशेष म्हणजे देवीची स्थापना पासून तर विसर्जनापर्यंत यासह मंडळाच्या सजावटी पासून निवडणुकीत लेझीम आणि दांडिया च्या साह्याने दुर्गा मातेच्या या दहा दिवस चालणाऱ्या आहे.
तसेच सदस्य शारदा भावसार, उषाताई भावसार, हर्षदा महाजन, पुष्पाताई वाघ, माधुरी कोलते, संगीता चौधरी, लक्ष्मीताई यवकार, गंगुताई सपकाळे, अनिता महाजन, कविता राजपूत, बेबीताई टापरे, आशा भावसार, कल्पनाताई कोलते, आलकाताई हरदास, सुनिता माळी अशी यंदाची कार्यकारणी असून उत्सव साजरा करण्यासाठी सर्व महिला व पुरुष सहकार्य करणार आहे.