⁠ 
रविवार, मे 5, 2024

शिवजयंतीदिनी डॉक्टरांचे रक्तदान

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्यासह डॉक्टरांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. रयत सेवा त्यांच्यासाठी केंद्रबिंदू होती. त्यामुळे वैद्यकीय सेवेत असणारे घटक शिवजयंतीला रक्तदानासाठी एकत्र आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असणाऱ्या रक्तपेढीमध्ये डॉक्टरांनी रक्तदान केले. यामध्ये आठ जणांनी रक्तदान केले. रक्तपेढीतील डॉ. मनोज पाटील, कर्मचारी रोहिणी देवकर यांनी सहकार्य केले.

सुरुवातीला प्रभारी अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले यांनी रक्तदान केले. त्यांच्यानंतर डॉ.गोपाळ डव्हळे, डॉ.स्नेहा वाडे, डॉ.वैशाली पाटील, डॉ.कुणाल ठाकरे, डॉ.शिवम उपाध्याय, डॉ. नीलांजना गोयल यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सर्व डॉक्टरांचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले आहे.