---Advertisement---
बोदवड

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एसटीमध्ये केले महिलांचे स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या तिकीट दरात ५०% सवलत देण्याची घोषणा केली होती. या योजनेच्या अनुषंगाने दि.१७ मार्च पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यान्वित करण्यात आली आहे.

bjp women cell jpg webp webp

या योजनेत महिलांना ५०% टक्के सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रभर महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटीने प्रवास करता येणार आहे. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील बसस्थानकात भाजपच्या वतीने महिला प्रवाश्यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी महिला प्रवाशांमध्ये आनंद दिसून आला तसेच महिलांनी राज्य सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार ही मानले.

---Advertisement---

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हा समन्वयक गीता गिल्ड़ा, जिल्हा उपाध्यक्षा अनिता अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस संगीता पाटील, जिल्हा चिटणीस शीतल देशमुख, माजी जि प सदस्या प्रतिभा राणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा रेखा हिंगे, बोदवड तालुका उपाध्यक्षा ललिता चौधरी, कविता जैन, सुवर्णा जैन, रोहिणी पाटील, लता शिरपुरकर, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, सोशल मिड़िया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, शहर सरचिटणीस वैभव माटे, संजय अग्रवाल, मधु पारधी, महेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---