लाडकी बहीणचे पैसे थकले ! जळगावातील महिला आक्रमक, थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या

जानेवारी 27, 2026 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२६ । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंर्तगत पात्र महिला दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून या योजनेचे पैसे थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये संक्रातीपूर्वी मिळाले. मात्र या योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

LBY

यातच जळगावमध्ये लाडक्या बहिणींनी आक्रमक झाल्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आहे. लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisements

जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र, के वाय सी केल्याच्या नंतर एक लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने या महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगत आहेत.

Advertisements

हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार होत नसल्याची तक्रार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ज्या अडचणी येत आहेत. या संदर्भात लाडक्या बहिणींनी 181 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेक महिलांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होत नसल्याचं समोर आलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now