---Advertisement---
नोकरी संधी बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रातील अंगणवाडीत 18,882 पदांच्या भरतीची घोषणा, महिलांना नोकरीची संधी..

anganwadi bharti (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । नोकरी भारतीबाबतची सर्वात मोठी बातमी सामोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्यातब्बल १८ हजार ८८२ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी (Anganwadi Bharti) सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. Women and Child Development Department Bharti 2025

anganwadi bharti (1)

या संबंधित बैठक मंत्रालयातील दालनात आज घेतली गेली, ज्यामध्ये महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने राज्यभरात ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील महिला व बालविकास विभागांतर्गत ही भरती एक महत्त्वपूर्ण भाग आहे.या भरतीमुळे अनेक बेरोजगार महिलांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे.

---Advertisement---

भरती प्रक्रिया
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पात्रता आणि निवड प्रक्रिया
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती करण्यात येत असताना, उमेदवारांना किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विधवा, अनाथ, एससी-एसटी, ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षाचा अध्यापन अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातील. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आरक्षणाच्या आधारे केली जाईल. काही प्रकरणांमध्ये मुलाखत घेतली जाऊ शकते.

महत्त्व आणि प्रभाव
अंगणवाड्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या नवीन भरतीमुळे अंगणवाड्यांमध्ये अधिक कर्मचारी उपलब्ध होतील आणि मुलांना चांगली सेवा मिळू शकेल. राज्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये मदतनीसांची पदे रिक्त असल्याने, ही भरती महिलांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---