अरेरे..! केवळ ३०० रुपयाची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

जानेवारी 31, 2023 9:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२३ । उतार्‍यावर नाव लावण्यासाठी अवघ्या ३०० रुपयाची लाच घेताना भुसावळ तालुक्यातील साकरी येथील महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केली. एम.एन.गायकवाड असे लाचखोर तलाठ्याने नाव असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

lach jpg webp

भुसावळ येथील तक्रारदाराचे सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी साकरी येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांनी तीनशे रुपयांची लाच मागितल्याने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार करण्यात आली होती व लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.

गायकवाड यांनी लाच देण्यासाठी तक्रारदाराला खडका, ता.भुसावळ येथील कार्यालयात बोलावले व लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने गायकवाड यांना अटक केली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now