जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । सकाळी सकाळी उठून मंदिरात दर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलेवर काळाने झडप घातली. महिलेस ट्रकने मागून धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ घडली. मीनाबाई मोहन अग्रवाल (वय ५५) असे मयत महिलेचे नाव असून अपघाती निधनामुळे (Accident Death) परिसरावर शोककळा पसरली आहे.

काय आहे घटना?

मीनाबाई अग्रवाल या तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवाशी आहेत. त्या सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी जात असतांना त्यांना शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळ ट्रकने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
हे देखील वाचा :
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त









