मुक्ताईनगरात महिलेची हत्या, कॅरीबॅगमध्ये भरून फेकला मृतदेह

ऑगस्ट 29, 2022 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच असून आज पुन्हा मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेचे अतिशय क्रूर हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या घटनेने परिसर हादरला आहे. याबाबत पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

murder 3

मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी सदर महिलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. धक्कदायक म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली आहे. तर मृतदेह काढण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तोवर सुरूच होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरात दोन हत्या झाल्या असून यावल तालुक्यात दोन, चाळीसगावा एक खून झाले आहेत. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसर हादरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now