अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू; दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 29, 2021 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । नशिराबादकडून भुसावळकडे जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकी चालकाने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेत सरताजबी इकबाल शहा या गंभीर जखमी झाल्या होत्या, दरम्यान, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रविवार दि.२८ रोजी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

accident jpg webp

नशिराबाद येथील मोमीन मोहल्ला येथील रहिवाशी इकबाल शहा सांडू (वय-४५) हे त्याची पत्नी सरताजबी इकबाल शहा (वय-४२) यांच्यासह शनिवार दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (क्र. एम.एच.१९, डी.यू.३५५८) ने दुचाकीने नशिराबादकडून भुसावळकडे जात होते. यावेळी माऊली पेट्रोल पंपाजवळ समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या अनोळखी दुचाकी चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या घटनेत सरताजबी शहा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी रविवार दि.२८ रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now