जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; बसमध्ये चढताना महिलेकडील सोने असलेली पिशवी लांबविली

मे 22, 2025 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२५ । जळगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यातच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा फायदा घेत पर्स, मंगलपोत लांबविल्याच्या घटना बसस्थानकात घडत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आलीय. शहर पोलिस ठाण्यापासून ५० मीटरवर असलेल्या टॉवर चौकात चोपडा बसमध्ये चढताना ५२ वर्षीय महिलेच्या पर्समधून १४ हजार रुपयांचे सोने असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान पाच महिन्यातील या ठिकाणी बसमध्ये चढताना चोरी होण्याची ही चौथी घटना आहे.

gold polish

जानकीबाई भगवान पाटील (वय ५२, रा. गुजर अळी, चोपडा) या शनिवारी सव्वापाच वाजेच्या सुमारास जळगाव-चोपडा बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेल्या ज्वेलर्सच्या पिशवीतून अर्धा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पंख्या, एक ग्रॅमची कानातील बाळी असे एकूण १४१८० रुपयाचे सोने लंपास केले.या प्रकरणी सोमवारी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील हे करीत आहे.

टॉवर चौकातील प्रमुख घटना
६ जानेवारी : वेळ दुपारी ४ वाजता, महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र भामट्यांनी लांबवले होते. ११ जानेवारी : वेळ दुपारी ३ वाजता, डांभुर्णीच्या शेतकऱ्याचे कांदा विक्रीतून आलेले २२, २०० रुपये लांबवले होते. १० मार्च: वेळ दुपारी ४.३० वाजता, यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील वृद्धेची ८ ग्रॅमची पोत लंपास झाली होती

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment