जळगावात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । रस्त्यात पडलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागून एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी जळगावातील तांबापुरमधील बिलाल चौक जवळ घडली. जिन्नताबी हुसेन शेख (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, जिन्नताबी शेख  या आज दुपारी कपडे सुकवण्यासाठी अंगणात आल्या होत्या. यावेळी अंगणात तार तुटून पडलेला होता. त्या ताराचा त्यांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना  तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.