जळगाव जिल्हाराजकारण

खडसेंना मतदान करणार ? आमदार सवकारे यांचे मोठे विधान !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी एकनाथराव खडसे यांना ते मतदान करणार असल्याच्या चर्चां बाबद मोठे विधान केले आहे ते म्हणाले कि, मी भारतीय जनता पक्षाचा निस्सीम कार्यकर्ता असून पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. मी एकनाथराव खडसे यांना मतदान करेल हा दावा कपोलकल्पीत आहे. मीडियाला या बातम्या कोण पुरवत आहे हे मीडियालाच माहित. माझी या बाबादची भूमिका ठाम असून जे पक्ष सांगेल तीच मी करणार आहे,

विधानपरिषद निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे आता नक्की झाले आहे. त्यात एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकिट दिल्याने जिल्ह्यासाठी हि निवडणूक महत्वाची झाली आहे. जिल्हावासियांनाही यात मोठा इंटरेस्ट येत आहे. या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे नाथाभाऊंचे समर्थक असल्याने ते त्यांना मतदान करणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भातील वृत्त प्रकाशित होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या प्रकरणी स्वत: आमदार संजय सावकारे यांनी आज भुसावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्वत:ची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा निस्सीम कार्यकर्ता असून पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. मी एकनाथराव खडसे यांना मतदान करेल हा दावा कपोलकल्पीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, एकनाथराव खडसे हे आपल्यासाठी आदर्श होते, आणि यापुढेही राहणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. यामुळे या प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Back to top button