⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | दूध संघाच्या निवडणुकीत भाजप – सेना युती होणार?

दूध संघाच्या निवडणुकीत भाजप – सेना युती होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा सहकारी दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांची खलबते सुरू असून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला आता दोन दिवस उरले असतांनाही चित्र स्पष्ट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता संघात सेना भाजप युती होणार असे म्हटले जात आहे. या अनुषंगाने ना. गिरीश महाजन यांच्या समवेत महत्वाची बैठक नुकतीच पार पडली असे म्हटले जात आहे. मात्र अजून या बाबत कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, सोमवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात गुलाबराव पाटील यांचाही अर्ज आहे. गुलाबराव पाटील यांनी आजवर सहकारात प्रवेश केला नव्हता. तथापि, आता त्यांनी जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्र्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे,

author avatar
टीम जळगाव लाईव्ह