⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

फसवणूक : सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । शहरातील मेहरूण शिवारात असलेली मालमत्ता परस्पर दुसऱ्याच्या नावे करून विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत तुकाराम भंगाळे यांनी याबाबत फिर्याद दिल्यावरून सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठीसह ८ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा येथील रहिवासी असलेले वसंत तुकाराम भंगाळे वय-७४ यांच्या पत्नी मयत झाल्यावर मेहरूण शिवारातील सर्व्हे क्रमांक २१/१ब मधील १००८.३३ चौ. फूट मालमत्तेत बांधलेले घर त्यांच्या नावे झाले होते. १६ जुलै २०१० ते २२ जुलै २०२२ पावेतो मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी रा.मेहरूण याने इतरांना सोबत घेत परस्पर मिळकतीवर कब्जा केला आणि त्याची विक्री केली होती.

वसंत भंगाळे यांनी याप्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनुसार मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी रा.मेहरूण, मो. इद्रिस मो. खलील रा.कानळदा, अशोक माळी, रमेश पाटील, जगदीश पाटील, दि.२२ जुलै २०२२ रोजी कार्यरत असलेले सहाय्यक दुय्यम निबंधक व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, जळगाव शहर मंडळ अधिकारी राजेश शंकर भंगाळे, मेहरूण तलाठी राजू कडू बाऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रविंद्र सोनार करीत आहेत.