शरद पवार 11 नोव्हेंबरला जळगाव जिल्ह्यात; चार ठिकाणी जाहीर सभा घेणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने ८७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहे. यासाठी शरद पवार हे स्वतः राज्यभर दौरे करणार आहे. त्यानुसार शरद पवार ११ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात येणार असून यादरम्यान त्यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा घेण्याचं नियोजन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाला सुटलेल्या जागांवर शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शरद पवार ११ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहे. जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि जळगाव ग्रामीणमध्ये त्यांची जाहीर सभा होणार असल्याचं समजतेय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ८७ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. या सर्व ठिकाणी शरद पवार यांना जाणे शक्य होणार नाही. यापैकी निवडक मतदारसंघांत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही ते १४ दिवसांत ५६ सभा घेणार आहेत. यातूनही ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सभा देण्याचे नियोजन केले जाईल.