---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांना ३४ लाखांत गंडविले; पोलिसांनी व्यापाऱ्यासह पत्नी-मुलाला ठोकल्या बेड्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव-जामदा परिसरातील १७ शेतकऱ्यांना ३४ लाखांत गंडविणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला पत्नी व मुलासह अटक करण्यात आली. तब्बल एक वर्षापासून हे तीनही जण पोलिसांना गुंगारा देत होते. कापूस व्यापारी पंडित दशरथ ब्राम्हणकर (५८), पत्नी छायाबाई ब्राम्हणकर (५६), मुलगे चेतन व रूपेश ब्राम्हणकर (सर्व रा. खेडगाव, ता. चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

crime 2 jpg webp webp

पंडित ब्राम्हणकर याने मुलगा चेतन व रूपेश ब्राम्हणकर तसेच पत्नी छायाबाई यांच्या मदतीने जामदा खेडगांव परिसरातील २५-३० शेतकऱ्यांकडून तब्बल ४९० क्विंटल कापूस उधारीवर खरेदी केला होता. बराच कालावधी उलटूनही पैसे दिले नाही.

---Advertisement---

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १७ शेतकऱ्यांनी मेहुणबारे पोलिसांत अर्ज दिला. या प्रकरणी जितेंद्र सुपडू महाले (रा. जामदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार संशयितांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत ६ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे चारही जण फरार होते.

मेहुणबारे येथील नव्याने नियुक्त पोलिस निरीक्षक म्हणून प्रवीण दातारे यांना शेतकऱ्यांच्या तक्रारीची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी पाठवले. फौजदार सुहास आव्हाड, पोकॉ. गोकुळ सोनवणे व नीलेश लोहार यांच्या पथकाने पुण्यात जाऊन वरील संशयितांना अटक केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---