त्यावेळी तुही तोंड गप्प करून का बसला होता? खा. संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ ।  देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्यावेळी तुह्मी तोंड गप्प करून का बसला होतात? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले कि, महाजन आणि फडणवीसांना अटक करण्याचा काही विषय नव्हता.मात्र तसं असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यात सहभागी होता. तेंव्हा तोंड गप्प करून का बसला होतात?

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन अटक वादावर भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला होता. मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार असून त्यावेळी मी काय म्हणालो होतो, हे मी योग्य वेळी सांगेन ,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.