⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत फक्त सत्तेसाठी अभद्र युती का ? आ. चिमणराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ ।  कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत फक्त सत्तेसाठी अभद्र युती का ? असा सवाल शिवसेनेचे बांधखोर दमा चिमण पाटील यांनी एका व्हिडियोतून केला आहे. यावेळी ते म्हणाले कि, भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे. यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत फक्त सत्तेसाठी अभद्र युती का ? त्याची गरज काय ? राज्यातील राजकीय पेच शिगेला पोहचला असतांना शिंदे गटातर्फे आमदार चिमणराव पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका मांडताना दिसले

यावेळी आ. पाटील म्हणेल कि, नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्र मधील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. तर हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नाही की कोणता गट निर्माण करण्यासाठी, पक्ष तयार करण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी. आम्ही अखंड महाराष्ट्र, हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी बंड केले आहे. आणि आमच्या या बंडाच्या भूमिकेला दोन तृतीयांश पेक्षा अधिक पक्षाचे आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याप्रसंगी त्यांनी कॉंग्रेस व विशेष करून राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांच्यासोबत जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली.

आ. चिमणआबा पाटील पुढे म्हणाले की, एकनाथराव शिंदे यांच्यासोबत पक्षाचे दोन तृतीयांश सदस्य आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातील हा एक मोठा प्रयोग असून यातून समविचारी सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.