जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । मालमत्ताधारकांकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीची वसुली व्हावी यासाठी मनपाने अभय योजना जाहीर करून मालमत्ताधारकांना दंडाच्या रकमेत सवलत द्यावी, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. परंतु या पत्रावर आयुक्तांकडून निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महापौरांनी तीन वेळा पत्रव्यवहार करूनही हि योजना लागू होत नाहीये.
महापालिकेकडून करची थकबाकी वसुलीसाठी अभय योजना देण्यात येत होती. यापुर्वीच्या आयुक्तांनी वेळो करुन मालमत्ता व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेत सुट दिली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात कराची थकबाकी वसुल झाली होती. तरीही शहरातील मालमत्ता धारकांकडे ही थकबाकी वसुल झाल्यास शहरातील सोई सुविधा पुरविता येणे शक्य होणार आहे. मात्र, वसुली होत नसल्यामुळे शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देखील पुरविता येत नसल्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त देवीदास पवार यांना अभय योजना जाहीर करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे.मात्र याचा उपयोग होत नाहीये.
महापौरांनी दिलेल्या पत्रात थकबाकीदार मालमत्ता धारकांना दंडाच्या रक्कमेत सवलत मिळावी म्हणून अभय योजना लागू करण्यात यावी, असे नमुद करण्यात आले आहे. यात जानेवारी महिन्यात थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना दंडाच्या रक्कमेत ९० टक्के सवलत, फेब्रुवारीत भरणाऱ्यांना ७० टक्के सवलत व मार्च मध्ये थकबाकी भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात यावी,असे म्हटले आहे.