जबाबदार कोण ? पुन्हा अल्पवयीन मुलीला पळविले!

सप्टेंबर 10, 2022 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असून आता तर रोजच असे वृत्त समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच जळगाव शहरात दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा धरणगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून थेट याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 6 jpg webp

तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुललीला कुणी तरी पळवून नेले आहे. या तरुणीचे वर्णन रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ४ फुट ३ इंच, अंगात आकाशी रंगाचा टॉप तर पांढऱ्या रंगाची पेन्ट परिधान केले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या राहत्या घरातून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

मात्र, दोन दिवसांपूर्वीस जळगाव शहरातील एका भागातून दोन अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर लागलीच ही घटना समोर आली असल्याने नागिकांमधून विविध प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, जबाबदार कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now