⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हुतात्मा एक्प्रेस सुरु होणार कधी ? प्रवाशांचा सवाल

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । काेराेनाच्या पहिल्या लाटे पासून बंद करण्यात आलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. काेराेनाची लाट ओसरल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केलेली नाही.यामुळे आता कि गाडी सुरु कधी होणार असा सवाल प्रवासी नागरिक विचारात आहेत.

मनमाड-मुंबई गाेदावरी एक्सप्रेस ही गाडी लाेकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस कधी सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे.

हुतात्मा एक्स्प्रेस गेल्या २ वर्षांपासून बंद आहे. नाशिक, कल्याण, पनवेल, लाेणावळा आणि पुण्याला जाण्यासाठी ही गाडी साेईची आहे. या गाडीला स्लीपर काेचदेखील लावण्यात आला आहे. मात्र ही गाडीच बंदच असल्याने, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्सच्या भाड्याचा भुर्दंड बसत आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे गगनाला भिडले आहे. विशेष म्हणजे साेलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत येते. मात्र पुण्यापासून भुसावळसाठी ही गाडी का सुरू केली जात नाही? असा प्रश्न आहे. मनमाड येथून सुटणारी गाेदावरी एक्स्प्रेस ही गाडी, त्या परिसरातील लाेकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली. आता जळगाव जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करावी, मागणी हाेत आहे.