⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | राजकारण | हा कुठला न्याय ? आमदारांवर लाखोंचा खर्च : पूरग्रस्तांसाठी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ

हा कुठला न्याय ? आमदारांवर लाखोंचा खर्च : पूरग्रस्तांसाठी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडले आणि ते आसाम येथील गुवाहाटी येथे रेडिसन हॉटेलमध्ये पोहोचले.यामुळे आसामची राजधानी गुवाहाटी हा सध्या संपूर्ण भरता सह जगाचा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्याच आसाम मध्ये आलेल्या पुरात ज्या नागरिकांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले. त्या नागरिकांकडे कोणताच सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये. कारण या आमदारांवर लाखोंचा खर्च होत असताना जे नागरीक या पुरामुळे देशोधलीला आले. त्यांना सरकार फक्त दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ इतकीच मदत करत आहे. अशे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ईशान्येचे आसामचे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणाचे आखाडा झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये ठाण मांडून आहेत. याशिवाय आसाममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. आसामच्या पुराची जी चित्रे समोर येत आहेत ती अस्वस्थ करणारी आहेत. लोक अन्न आणि पिण्याच्या पाण्यासाठी आसुसलेले आहेत. तिथल्या लोकांच्या घरात सगळं उद्ध्वस्त झालं आहे. पण नेते देशाच्या एकाच भागातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये हजर असतात. या हॉटेलचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. Radisson Blu सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या पैशातील काही भाग पूरग्रस्तांसाठी खर्च केल्यास त्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद येईल, असे लोक सांगत आहेत.

बोले भारत नावाच्या ट्विटर युजरने लिहिले आहे की, रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहणारे आमदार रोज 8 लाख रुपयांचा खर्च खाण्यावर होतो. त्याचबरोबर आसाममधील लोकांना पूर मदत निधीच्या नावाखाली दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ वाटली जात आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.