⁠ 
शनिवार, जून 15, 2024

विकासकामे सुरु असताना नक्की काय करावे आणि काय करू नये? महापौरांनी दिल्या सूचना !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । जळगांव शहरात विविध भागांत विकासकामे सुरु करण्यात आलेली आहे. अश्यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सूचना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यावेळी सूचना करतांना महापौर जयश्री महाजन पत्रात म्हणाल्या आहेत कि, संबंधात काही विशिष्ट बाबी आपल्या निर्देशनास आणून देण्यात येत आहेत. कृपया त्या संबंधात आपण जातीने लक्ष देवून योग्य ती उपाय योजना केल्यास कामाची गुणवत्ता राखणे शक्य होईल.

रस्त्यांच्या कामासंबंधात अंदाजपत्रक तयार करतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या गटारीच्या हद्दी पर्यंत (End to End) अंदाजपत्रक तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता राखता येते असे निर्देशनास आलेले आहे. रस्ता गटारीच्या हद्दीपर्यंत न करता दोघी बाजूने साईटपट्ट्या सोडून मधोमध केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील स्क्रॅप मटेरिअल साईडपट्ट्यावर पडून राहते व त्यामुळे धुळीचा प्रार्दुभाव होतो. शिवाय सदर स्क्रॅप गटारीत पडून गटारी ब्लॉक होतात. त्यामुळे असे अंदाजपत्रक दुरुस्त करणे आवश्यक आहे. तसेच यापुढील रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करताना उपरनिर्दोष्ठ दक्षता घ्यावी.

रस्ते विकसित कामे करतांना लीक्वीड ऐवजी प्रिमिक्स सील कोट करण्यात यावे. तसेच रस्ते डांबरीकरण झालेवर त्यावरील स्क्रॅप हटवून लगेचच सिलकोट केल्यास रस्त्याची गुणवत्ता वाढते व रस्ता जास्त काळ टिकतो.

ज्या रस्त्याचे काम झालेले आहेत त्या रस्त्यावरील स्क्रॅप मटेरिअल निविदेनुसार मक्तेसाराने उचलवायचे असल्यास मक्तेदाराकडून त्वरीत उचलणेत यावे. जर महानगरपालिकेने उचलायचे असल्यास आपल्या कर्मचान्यांमार्फत अति शिघ्र उचलणेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी.

महानगरपालीकेचा बांधकाम विभागांच्या सर्व युनीट कनिष्ठ अभियंता यांना आदेशीत करून त्यांच्या युनिट हदीतील सर्व दुभाजक (डिव्हायडर) इलेक्ट्रीक पोल, झाडे, ओपनस्पेस चे तार कंपाऊंड व तत्सम बाबी यांना चुना, गेरु ने कलर करणे संबंधात त्वरीत कार्यवाही करणे संबंधात सूचना देण्यात याव्यात. जेणे करून शहर सौंदर्यात भर पडेल युनीट मध्ये उपरनिर्दिष्ट कामे पूर्ण झाल्यावर संबंधीत नगरसेवकाचे तसे पत्र घेवून ते सादर करणे संबंधात कनिष्ठ अभियंता यांना निर्देशित करण्यात यावे.

महापालीकेच्या मालकीच्या सर्व व्यापारी संकुल, मार्केट शाळा मधील कचरा उचलून त्यांची साफसफाई करणे संबंधात निर्देशीत करण्यात यावे व त्यात सातत्य ठेवणेचा सूचना कराव्यात त्याच प्रमाणे सर्व युनीट कार्यालये, (आरोग्य. पाणीपुरवठा, बांधकाम) तसेच महापालीकेची प्रशासकिय इमारत व प्रभाग समित्यांची कार्यालये गांची साफसफाई सतत दैनंदिन करणे संबंधात सूचना करण्यात यावे अस्वच्छता आढळल्यास संबंधीतांवर कारवाई करणेत यावे.

सर्व प्रभाग कार्यालये, युनीट कार्यालये व प्रशासकीय इमारती या मधील सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना करून त्यांनी आपापल्या कार्यालयातील सर्व फायलीग सुव्यवस्थीत ठेवणे संवधान निर्देश घ्यावे जी प्रकरणे नस्तीबंद झालेली आहेत व जुनी झालेली आहेत ते रेकार्ड विभागात जमा करणेच्या सूचना द्याव्यात.

शहरातील सर्व पथदिवे सुव्यवस्थीत व नियमीतपणे सुरु ठेवणे संबंधात विद्युत अभियंता याना निर्देशीत करावे सर्व प्रभागातील पथदिवे सुरु आहेत या संबंधात संबंधीत नगरसेवक यांचे कडून तसे संमतीपत्र घेवून सादर करणे संबंधात सूचना करण्यात याव्यात.

शहरात राष्ट्रीय पुरुषांची पुतळे असून त्यांची योग्य ती निगा राखणे क्रमप्राप्त आहेत. यास्तव फायर विभागास निर्देशित करून दर रविवारी सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे स्वच्छ धूवून घेणे संबंधात व परिसरात स्वच्छता ठेवणे संबंधात आदेशित करणेत यावे.

शहरातील अतिक्रमण निर्मूलन करतांना जप्त करण्यात आलेले सामान महापालीकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ठेवण्यात येते त्यामुळे त्याठीकाणी विदारक परिस्थिती दिसते सदर जप्त सामान एम.आय.डी.सी भागात असलेल्या फायर स्टेशनचे जागेवर हलविण्यात यावे व यापुढे जप्त करण्यात आलेले सामान साहित्य त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे प्रशासकीय इमारतीत आगंतुक ये-जा असते त्यामुळे सदर परिसर कायम स्वच्छ व सुंदर ठेवणेत यावा,

सर्व विभाग प्रमुखांना आदेशित करून त्यांच्या विभागाकडील निकामी व भंगार साहित्य गेंदालाल मिल परिसरात एकत्रीत-करून त्याची लीलाव पद्धतीने विल्हेवाट लावणेत यावे ग्रंथालयातील रद्दी पेपर्स सुद्धा लोलावाने विक्री करणेत यावी.

शहरातील प्रमुख चौक सुशोभिकरणासाठी प्रायव्हेट कंपन्यांना दिलेले आहेत. सदर चौकाची रंगरगोटी व सुशोभिकरण करणे संबंधात त्यांना विनंती करून चौक सदैव सुशोभित राहतील याची दक्षता घेणे संबंधात संबंधीत अभियंता यांना सूचना करण्यात याव्यात.

सर्व प्रमुख रस्त्यांना रोड मार्किंग पेंटने पांढरे, पिवळे पट्टे व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात यावे. (१३) शहरातील सर्व प्रमुख चौकात सिग्नल व्यवस्था अद्यायावत करण्यासाठी अदजपत्रक तयार करण्यात यावे.

उपरनिर्दिष्ट मुद्द्यां संबंधात आपल्या स्तरावरून संबंधीत अधिकारी यांना सक्त सूचना करून कार्यवाही करणे संबंधात निर्देशित करण्यात यावे तसेच करण्यात आलेल्या व करावयाच्या कार्यवाही संबंधातील अहवाल दर १५ दिवसांनी आमचे कडेस माहितीसाठी सादर करणे संबंधात संबंधीतांना निर्देशिन करून आपल्या मार्फत अहवाल आम्हास अवगत करणेची दक्षता घ्यावी ही अपेक्षा