⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | ‘अहिल्या संदेश यात्रेचे’ पाळधी येथे जोरदार स्वागत

‘अहिल्या संदेश यात्रेचे’ पाळधी येथे जोरदार स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहिल्यादेवींनी सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड घातली : ना.गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ‘अहिल्या संदेश यात्रेचे’ पाळधी येथे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, विहिरी खोदल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. त्यांनी भारतात अनेक मंदिरे बांधली व मंदिरांचा जीर्णोध्दार देखील केला. एक आदर्श राज्यकर्ता कसा असावा, याचे त्या मुर्तीमंत उदारहण आहेत, असे विचार ना.गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षा निमित्ताने अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती सर्व जाती धर्मातील लोकांना व समाजाला माहीत होण्यासाठी तसेच त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी केलेले कार्य, समाज जनजागृती, आणि समाज संघटनासाठी हे सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने अहिल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेचे पाधळी येथे आगमन झाल्यानंतर ना.गुलाबराव पाटील यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी समाजबांधवांसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील केला. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली, असे ना. पाटील यांनी मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी सुभाषभाऊ सोनवणे, रमेश सुलतानने, प्रभाकर न्हडले, सुभाष करे, अरुण ठाकरे, गणेश बागुल, महेंद्र सोनवणे, तुळशीराम सोनवणे, दिलिप धनगर, यशवंत शिरोळे, कुणाल सुलतानने, रेखाताई न्हालदे, प्रमिलाताई कणखरे, चित्राताई वाघ, युवराज बापू, माधव पवार, दिगंबर पवार, प्रभाकर शिरोळे, सागर शिरोळे, भुरा पवार, दशरथ संगोरे, अनिल शिरोळे, भगवान पवार, राहुल ठाकरे, भैया पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.