---Advertisement---
कोरोना जळगाव शहर राजकारण

गुलाबभाऊंची ‘वीक एंड लॉकडाऊन’ आयडिया मुख्यमंत्र्यांनी आणली अंमलात

gulabrao patil uddhav thackeray
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे राज्यात वीक एंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या वीक एंड लॉकडाऊनची संकल्पना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मांडली होती. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत राज्यात अंमलात आणली.

gulabrao patil uddhav thackeray

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज ऑनलाईन या प्रकारात पार पडली. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव येथून सहभागी झाले. आजच्या बैठकीत लॉकडाऊन वा याला सक्षम पर्याय बाबत सविस्तर चर्चा झाली.

---Advertisement---

यात ना. गुलाबराव पाटील यांनी अन्य दोन मंत्र्यासह वीक एंड लॉकडाऊनचा पर्याय सुचविला असता, याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, राज्यात नवीन निर्बंध लवकरच लागू करण्यात येत असून यात शेतमालाच्या वाहतुकीला बंदी घालू नये आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर मात्र निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली असता याला देखील मान्यता देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीरची खासगी पातळीवर कृत्रीम टंचाई सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर शासकीय रूग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी देखील ना. पाटील यांनी केली. यावर जळगाव जिल्ह्यात रेमडेसीवरची टंचाई भासणार नाही इतका पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---