जळगावात उन्हाचा चटका वाढला; जाणून घ्या कसे असेल हवामान

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । गेल्या दाेन दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सध्या जळगावातील कमाल तापमान ४१-४२ अंश सेल्सिअसवर आहे.

अवकाळी पावसाचे सावटामुळे जिल्ह्यात काही दिवस ढगाळ वातावरण होते. परंतु गेल्या २ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे. येत्या दाेन दिवसात तापमान स्थिर राहणार असून मंगळवार आणि बुधवारी वातावरण ढगाळ राहणार असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.

विदर्भापासून तमिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे निरीक्षण पुण्यातील भारत माैसम विभागाने नाेंदविले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दाेन दिवसानंतर वातावरण ढगाळ असेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज