⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | उद्यापासून जळगावचा पारा पुन्हा वाढणार, वाचा आजचे तापमान

उद्यापासून जळगावचा पारा पुन्हा वाढणार, वाचा आजचे तापमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । राज्यातील काही जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे अवकाळी पावसाचे ढग कायम असल्याने तापमानाचा पारा किंचित घसरला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट किंचित कमी झाली असली तरी तापमान मात्र अजूनही ४२ अंशांवर स्थिरावले आहे. मात्र, उद्यापासून तापमान पुन्हा ४३ अंशांपुढे जाण्याची शक्यता असून झळा पुन्हा तीव्र हाेऊ शकतात.

यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरी पासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर चालू महिन्यात राज्यातील काही ठिकाणी तो ४३ अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यात काल बुधवारी ४२ अंशांवर स्थिरावले. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे.

आजचे तापमान असे

आज सकाळी ११ वाजेपर्यंत पारा ३९ अंशांपुढे गेला होता.तो १२ नंतर ४० वर गेला होता.
दुपारी १ वाजेला – ४० अंश
दुपारी २ वाजेला – ४१ अंश
दुपारी ३ वाजेला – ४२ अंश
सायंकाळी ४ वाजेला – ४२ अंश
सायंकाळी ५ वाजेला – ४२ अंश
सायंकाळी ६ वाजेला – ४१ अंश
तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत कमी होऊन ३८ वर स्थिरावणार, व रात्री ८ नंतर ३६ वर जाणार.

दरम्यान, दुसरीकडे देशातील काही ठिकाणी दोन आठवड्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरत आहे. दुसऱ्या दिवशीही तापमानात घट दिसली. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशात तापमान २-४ अंशांनी कमी झाले. तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये तापमान २-३ अंशांनी खाली आले.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत, तर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान असे- चंद्रपूर ४३.२, अमरावती ४२.८, वर्धा ४२.८, अकोला ४२.३, मालेगाव ४२.२, नागपूर ४१.६, गोंदिया ४१.५, सोलापूर ४१.०, जळगाव ४०.६, औरंगाबाद ४०.२, बुलडाणा ४०.०, नाशिक ३९.२, पुणे ३८.९, सातारा ३८.९.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.