⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात आजपासून तीव्र उष्णतेची लाट? वाचा जळगावचे दिवसभरातील तापमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी उन्हाचा पारा उच्चांकी पातळीवर होता. काल दिवसभरात उन्हाचा पारा ४४ अंशांवर होते. दरम्यान, पूर्वमाेसमी पावसाचे ढग घाेंगावत असताना आज मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासह ही लाट कायम राहणार आहे.

मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील पारा राज्यातील सर्वाधिक उच्चांक पातळीवर गेल्याने विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव जळगाव जिल्ह्यावर जाणवला.रविवारी जिल्ह्यातील पारा ४६ अंशावर गेला होता.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यावर घाेंगावत असलेल्या पावसाचे सावट अजूनही कायम आहे. ढगाळ स्थितीत तापमानाचा चटका अधिक तिव्रतेने जाणवत आहे. त्यात आजपासून उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दाेन ते तीन दिवसांमध्ये तापमान ४५ अंशांवर जाईल अशी शक्यता आहे. याच काळात विजांच्या कडकडाटासह पूर्वमाेसमी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या उष्णतामानात वाढ होण्याची पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१० वाजेला – ३८ अंश
११ वाजेला – ४० अंश
१२ वाजेला – ४१ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंशापुढे
३ वाजेला – ४३ अंश
४ वाजेला – ४३ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.