⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यात पावसाचा जोर ओसरला, 5 जिल्ह्यांना अलर्ट; आज कसं असेल जळगावचे हवामान?

राज्यात पावसाचा जोर ओसरला, 5 जिल्ह्यांना अलर्ट; आज कसं असेल जळगावचे हवामान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । मागील काही दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक धरणे काठोकाठ भरली असून बहुतांश नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. धुवाँधार बॅटिंगनंतर आता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान,हवामान खात्याने आज पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी राज्यातील कोकणामधील रायगड जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचबरोबर आज धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. तसेच रायगड, सातारा, रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने या भागांतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा तयार झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील तीन ते चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहे. आजही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.