⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दानधर्म केल्याने धनशुद्धी होते – जनार्दन महाराज

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । दानधर्म केल्याने शुद्धी होत असते प्रत्येकाने धर्मासाठी दान केले पाहिजे तसेच रोझोदा येथील काम सिद्ध मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास संचालक मंडळाने केला आहे तो खरोखर कौतुकास पात्र आहे असे मत जनार्दन हरीजी महाराज यांनी रोजदा येथे कामसिद्ध महाराज मंदिरातील सभामंडप व अन्य विकासकामे लोकार्पण सोहत व्यक्त केले.

परिसरातील सर्वच संत सज्जन मंडळीत व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात भव्य सभामंडप भक्तनिवास तसेच इतर विकासकामांचे लोकांना लोकार्पण उत्साहात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरीजी महाराज तर गोपाल चैतन्यजी महाराज,महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज, शास्त्री भक्ती किशोर दासजी,कृष्ण गिरीजी महाराज, भरत दासजी महाराज,स्वरूपानंद महाराज दुर्गादास महाराज,धनराज महाराज, भन्तेजी सुमन तिस्सा,ब्रह्मकुमारी वैशालीदीदी माजी मंत्री एकनाथ खडसे,खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील,पंचायत समिती सदस्या प्रतिमा बोरोले, नरेंद्र वानखेडे, यांच्यासह परिसरातील भक्तगण व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


पुढे बोलताना ते म्हणाले की रोझोदा गावचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कामसिद्ध महाराज मंदिराचे दृष्टी अतिशय तळमळीने सेवाभावी काम करीत असतात त्यामुळेच हा भव्यदिव्य कार्यक्रमाचे संपन्न होत आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व संचालक मंडळ एक एक रुपया हा मंदिराच्या कामासाठी उपयोगात आणतात असे देखील त्यांनी सांगितले