कापसाला चांगला भाव मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू – मंत्री गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या घरांमध्ये कापूस पडून आहे. कापसाला चांगला भाव मिळत नाही आणि तो भाव मिळेल या आशे पोटी शेतकरी कापूस घरातच ठेवून आहे. अशावेळी याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
पत्रकारांशी जळगाव येथे संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांचा जवळजवळ 65 टक्के कापूस हा घरात पडून आहे. शेतकऱ्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची असलेली नाराजी ही माहित आहे. अशावेळी याबाबत आम्ही धोरण ठरवत असून येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले
यावेळी ते असेही म्हणाले की, शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याबाबत आम्ही आढावा घेत आहोत. विविध बैठका घेत आहोत. केंद्रालाही याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती करत आहोत. आज जर शेतकऱ्याचा कापूस हा निर्यात झाला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.