⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दूध उत्पादक संस्थांच्या अडीअडचणी अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावू – अजय भोळे

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थाना मागील तीन वर्षापासून दुधातील एस एन एफ व फॅट संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. संस्था जसे दूध पाठविते तसे संघाकडून येत नाही यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने बऱ्याच संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे काही संस्थानी गुजरात राज्यातील दूध संघाचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी गट स्थापन करून दूध पुरवठा करीत आहे. ज्यामुळे जिल्हा दूध संघाचे दूध संकलन कमी झाले आहे. या सह नियमित एसएमएस व अन्य प्रक्रिया संदर्भातल्या अडीअडचणी अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनात आणून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे प्रशासकिय संचालक अजय भोळे यांनी दूध उत्पादक संस्थाना भेटुन सागितले.

दूध संघाला दररोज तीस हजार लिटर दूध बाहेरून विकत घ्यावं लागत. अश्यावेळी दूध संकलन वाढण्या करीता संचालक मंडळाने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. यावेळी जिल्ह्यातील काही दूध उत्पादक संस्थांना भेट देऊन त्यांच्या माध्यमातून अधिक दुधाचा संकलन करण्यासाठी दररोज प्रयत्न होत आहे. संघाला दूध उत्पादन देणाऱ्या संस्थांच्याही अडचणी यानिमित्ताने प्रशासकीय संचालकांसमोर आल्या आणि त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन त्यांनी यावेळी दिले.