---Advertisement---
बातम्या बोदवड

वॉटरमनचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू

---Advertisement---

budun mrutue jpg webp

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । वाडी येथील ग्रामपंचायतीच्या ३२ वर्षीय वॉटरमनचा लीक काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाडी येथील ग्रामपंचायतमध्ये वाटरमॅन म्हणून कार्यरत असलेला गोकुळ शेषराव पाटील (वय ३२) हा तरूण विहिरीजवळील पाइपचा लीक काढत होता. त्यावेळी पाय घसरून विहिरीतील वीज पंप बसवण्यासाठी लावलेल्या अँगलवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या रक्तामुळे विहिरीतील संपूर्ण पाणी लाल झाले होते. दरम्यान, जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी डॉ. हर्षल चांदा यांच्या माहितीवरून जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली अाहे. तपास सहायक फौजदार संजय पाटील करत आहेत. मृताच्या पश्चात गंभीर आजारी असलेली आई, दिव्यांग भाऊ, पत्नी,२ मुले असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---