⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महापौर जयश्री महाजन यांच्यामुळे पवार पार्कमधील नागरिकांना १२ वर्षांनी मिळाले पाणी

जळगाव लाईव्ह न्युज । १२ एप्रिल २०२२ । शहरातील चंदु अण्णा नगर भागात असलेल्या पवार पार्क भागात १२ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ३० हून अधिक कुंटूंबियांना महापौर जयश्री महाजन यांच्यामुळे अखेर महापालिकेतर्फे होणारा पाणी पुरवठा मिळाला आहे.या साठी या नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांचा सत्कारही केला.

या भागात महापालिकेकडून आतापर्यंत पाणी पुरवठा होत नव्हता, त्यामुळे या भागातील नागरिक आव्हाणे शिवारातील शेतकऱ्यांकडून भाड्याने पाणी घेत होते. अखेर अमृत पाणी पुरवठा योजनेतंर्गत या भागात जलवाहिणी टाकण्यात आली. त्यानुसार रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या भागात पाणी पुरवठा सुरु झाला आहे.

गेल्या महिन्यात पवार पार्क भागातील नागरिकांनी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील यांची भेट घेतली होती. त्यानुसार महापौरांनी मनपा अभियंत्यांना अमृत अंतर्गत वाढीव भागात सुरु असलेल्या कामात वाढ करून, पवार पार्कपर्यंत जलवाहिणी टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. या भागात अमृत अंतर्गत जलवाहिणी टाकल्यानंतर रविवारी या भागात पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या भागातील ३० कुंटूबांना हक्काचे पाणी मिळाले आहे. सोमवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी पवार पार्क येथे जावून, नागरिकांची भेट घेतली. यावेळी पवार पार्क भागातील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, पाणी पुरवठा विभागाचे गोपाळ लुल्ले, शाखा अभियंता सुनील तायडे आदी उपस्थित होते.