⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

धरणगावला टँकरने पाणी पुरवठा सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । जैन उद्योग समूहासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकाराने धरणगाव शहरात शुक्रवारी सकाळपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जैन उद्योग समूहाचे वीस हजार लिटर क्षमतेचे दोन तसेच लहान पाच हजार लिटर क्षमतेचे पाच टँकरने संपूर्ण गावात पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान धरणगावचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत अशाच पद्धतीने टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती देखील शिंदे गटाच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आदेशानुसार धरणगाव शहरात जैन कंपनीचे वीस हजार लिटर क्षमतेचे दोन व लहान पाच हजार लिटर क्षमतेचे पाच टँकर संपूर्ण गावात पाणी वाटप करीत आहेत. शहरातील रामदेवजी बाबान नगर, मोठा माळीवाडा परिसर पोलीस लाईनसह आता संपूर्ण गावात पाणी पुरवले जाणार आहे. जैन उद्योग समूहासह जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, विलास महाजन, वाल्मिक पाटील, पिंटू देशमुख,भैय्याभाऊ महाजन हे देखील स्थानिक पातळीवर ४ हजार लिटरच्या टँकरने पाणी पुरवठा करत आहेत. यासाठी माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, अभिजित पाटील, वासू चौधरी यांच्यासह पदाधिकारी हे मदत करीत आहेत.