जळगाव जिल्ह्यातील ‘या’ धरणाने गाठली शंभरी, 3 धरण शून्यावर; इतर धरणांच्या जलसाठ्याची स्थिती काय?

जुलै 26, 2025 2:44 PM

ळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । सध्या राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान जिल्ह्यात जोरदार पाऊस नसला तरी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे सुकी धरण १०० टक्के भरले आहे. तर तीन धरणांनी तळ गाठला आहे. अग्नवती, भोकरबारी आणि बोरी धरणातील जलसाठा शून्यावर आहे.

dam

जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाळ्याचे दोन महिने संपण्यावर आले. मात्र जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम असल्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसापासून पावसाने ब्रेक घेतल्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला.

मागील दोन-तीन दिवसात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बसरल्या. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. मात्र अद्यापही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही. आज शनिवारी (दि२६) हवामान खात्यानं जोरदार पावसाचा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मात्र सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने ओढ दिल्याचे दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा आहे. दुसरीकडे जिल्ह्यात जोरदार पाऊस नसला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे लहान – मोठ्या धरणांमधील जलसाठा वाढत असल्याचं दिसत आहे हे एक दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यातील पालजवळ असलेलं सुकी धरण 100 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे अग्नवती, भोकरबारी आणि बोरी धरणातील जलसाठा शून्यावर आहे. दिलासादायक म्हणजे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणात यंदा मुबलक जलसाठा आहे. आज शनिवारी सकाळपर्यंत वाघूर धरणाचा जलसाठा ६४.३५ टक्के इतका आहे. तर अर्धा जिल्ह्याची तहान भागविणारे गिरणा धरण ५६.४४ टक्के इतके भरले आहे. विशेष गेल्या वर्षी आजच्या दिवशी गिरणेत ११.७४ टक्के जलसाठा होता. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणात ४४ टक्केपेक्षा जास्त जलसाठा आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

सद्यस्थितीत उपलब्ध असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा :
हतनूर – २८.८० टक्के
गिरणा – ५६.४४टक्के
वाघूर – ६४.३५ टक्के
अभोरा – ६९.३१ टक्के
मंगरूळ- ४२.९४ टक्के
हिवरा – ५.६० टक्के
सुकी – १०० टक्के
मोर – ६४.०५ टक्के
बहुळा – २४.२० टक्के
अग्नावती – ०० टक्के
तोंडापूर – ८.८० टक्के
अंजनी – ४१.१८ टक्के
गूळ – ३१.७९ टक्के
बोरी – ०० टक्के
भोकरबाडी : ०० टक्के
मन्याड – ११.६४ टक्के
शेळगाव बॅरेज – ९.१३ टक्के

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now