⁠ 
शनिवार, मे 4, 2024

लवकरच वारकरी भवन उभारणार : पालकमंत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । जिल्हा नियोजन मंडळातून वारकरी आणि लोककला भवन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यात लवकरच भव्य वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव तालुक्यातील वाघळूद बुद्रुक येथील श्रीमद भागवत सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री बोलत होते. कीर्तन हे आपल्यासाठी उर्जास्त्रोत असून आपल्याला यातून सकारात्मक विचार मिळतात आणि अर्थातच जनसेवेची प्रेरणा मिळत असल्याचे ना. गुलाबराव पाटलांनी आवर्जून नमूद केले. तर ना. गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे काल्याचे संपूर्ण कीर्तन ऐकून नंतर वारकर्‍यांशी संवाद साधला.

तालुक्यातील वाघळूद बुद्रुक येथे श्री विठ्ठल मंदिर परिसरात आयोजीत श्रीमद भागवत हरीनाम कीर्तन सप्ताहाची गुरुवारी काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. ना. गुलाबराव पाटील यांनी काल्याच्या किर्तनाला हजेरी लावली. याप्रसंगी ते म्हणाले की, वाघळूद येथील श्री विठ्ठल मंदिराला “क” वर्गाच्या तीर्थक्षेत्राची नियोजनाच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. तर आता याला पर्यटन खात्यातर्फे निधी मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या जीवनावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव असल्याचे नमूद करत पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. वाघळूद बु।। येथे श्री. गुरू नथ्थुसिंग बाबा ज्ञानप्रचार दौरा मंडळाचा अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सप्ताहात आळंदी संस्थांचे कीर्तनकार ह.भ.प.उन्मेष जी महाराज (परभणी ) यांच्या काल्याचा कीर्तनाणे झाली तर ह.भ.प.श्रीपती महाराज राजपूत यांना पालकमंत्री गुलाबरवजी पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य पी.सी.आबा पाटील, यांच्यासह जेष्ठ नागरिक रामनाथ पाटील, सुखदेव पाटील, सरपंच द्वारकबाई पाटील, उपसरपंच संजय भिल, प्रवीण पाटील, मंदिर संस्थानचे अध्यक्ष बन्सीलाल पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, ईश्वर पाटील, सुभाषअण्णा पाटील व मच्छिंद्र पाटील उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
सप्ताह यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष बन्सीलाल पाटील, सचिव ह.भ.प. निंबा पाटील, रामनाथ पाटील, देवराम पाटील, रवींद्र पाटील, मणीलाल पाटील, भगीरथ पाटील, निलाचंद पाटील, राधेश्याम पाटील, विजय पाटील, किशोर पाटील व नथुसिंग बाबा मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सिंग महाराज राजपूत यांनी केले. तर आभार दिनेश पाटील सर यांनी मानले.

हे देखील वाचा :