⁠ 
सोमवार, मे 27, 2024

VIDEO : जळगावमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार जळगावच्या दौऱ्यावर असून त्यांची आज चोपडा येथे सभा झाली. चोपडावरून भुसावळकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली.यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आज शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्व मंडळी हे चोपडावरून भुसावळकडे चालले होते. शरद पवार यांचा ताफा यावल तालुक्यातील किनगाव जवळ पोहोचला. त्यावेळी शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कार दुसऱ्या वाहनाला धडकली. ताफ्यात शरद पवार यांच्या गाडीमागे असलेल्या ताफ्यातील दोन वाहने धडकले. या अपघातात कुणालाही दुखापत झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?
शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी चोपडा येथे सभा झाली. त्यानंतर त्यांचा ताफा भुसावळकडे रवाना झाला. भुसावळकडे जात असताना यावलजवळ गतीरोधक आला. त्यामुळे शरद पवार यांच्या कारचा वेग कमी झाला. त्यानंतर त्यांच्या कारच्या मागील काही वाहन चालकांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर त्यांची वाहने एकमेकांवर धडकल्या. यामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे.